१९९३ च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर अगदी जुजबी भांडी विकत आणून ती भाड्याने देण्याचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला.कोणत्याही प्रकारची माहिती, अनुभव किंवा पाठबळ नसताना हिंमत करून पहिलं पाऊल उचललं होतं.त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.एकतर आमचं घर भुसावळ च्या मध्य वस्तीत आहे आणि त्यात घरा शेजारीच ब्राह्मण संघ हे अतिशय प्रसिद्ध,जुने मंगल कार्यालय असल्याने त्याचा तसा फायदा मिळाला.
अनुभव नसतानाही शून्यातून सुरुवात केली होती पण तुमच्या सारख्या मायबाप ग्राहकांनी, हितचिंतकांनी, मित्रांनी आणि घरच्यांनी सतत पाठराखण केली. ती अशीच पुढेही कायम राहावी अशी नम्र विनंती.
२०१६ मध्ये ‘आमोद फॅन्सी ड्रेसेस’ या नावाने ड्रेपरी हाऊस सुरू करून एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले. भुसावळ शहरात वाढणाऱ्या शाळांचे प्रमाण आणि उत्साही विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, गॅदरिंग, गणेशोत्सव यात विविध नाच,नाटक, एकांकिका यासाठी विविध पोशाख आपण उपलब्ध करून द्यावे असा विचार प्रत्यक्षात आणता आला. त्यामुळे मुलं आणि पालक यांना हवे ते ड्रेस अल्पशा भाड्याने वापरण्यास दिले जातात.