फडके सर्व्हिसेस
१९९८ साली फडके केटरर्स ची सुरुवात केली. पदार्थांची उत्तम चव, काटेकोर स्वच्छता आणि प्रामाणिक व्यवहार कायम राखल्यामुळे व्यवसायात यश दिसू लागले. लोकांनी दाखवलेला विश्वास आणि घरच्यांची साथ हे फडके केटरर्स च्या यशाचे मुख्य स्तंभ आहेत. त्याच बळावर जवळपास १५०० पेक्षा जास्त लग्न व मुंज व स्वागत समारंभाचे केटरिंग केले आहे.याशिवाय एकुण १४०० पेक्षा जास्त छोटेखानी समारंभ, पार्टी चे यशस्वी नियोजन व व्यवस्थापन केले.आमचे संतुष्ट ग्राहक आनंदाने आम्हाला पुन्हा पुन्हा सेवेची संधी देतात हे आमच्या कामाचं प्रमाणपत्र आहे.
कोरोना काळातही आपल्या सेवेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
गेल्या वर्षीपासून कोरोनाने आपल्याला हैराण केले आहे. लॉकडाऊन, विलगीकरण, हॉस्पिटल, हे सतत सुरू आहे. अशा अडचणीत पेशंट ला, घरी आजारी असलेल्या किंवा वयस्कर लोकांची सोय व्हावी यासाठी घरपोच डबे पोचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सुपाच्य,गरम खिचडी,सूप, किंवा असेच साधे ,पथ्याचे जेवण घरपोच देण्याची व्यवस्था सुरू केली आहे.
फडके केटरिंग सर्विसेस
लग्न असो वा मुंज, तुम्ही फक्त समारंभ ठरवा…
साजरा करण्याची व्यवस्था आम्ही करू!
आजवरचा प्रवास खरंच मोठा आहे .व्याप कधी वाढला हे लक्षात आले नाही. शून्यातून सुरुवात केलेली पण तुमच्या सारख्या मायबाप ग्राहकांनी, हितचिंतकांनी, मित्रांनी आणि घरच्यांनी सतत जी पाठराखण केली त्याच बळावर जवळपास ३००० पेक्षा जास्त लग्न व मुंज व इतर छोटेखानी समारंभाचे केटरिंग केले आहे.
फडके भोजनालय
उत्तम चव, आरोग्याचे भान, घरच्या जेवणाचे समाधान !
२००७ सालापासून फडके भोजनालय सुग्रास, सात्विक,गरम जेवणाचा आनंद येथे येणाऱ्या खवय्यांना देत आहे.
घरच्यांच्या जेवणाची काळजी उरली नाही आता….!
असं सांगणारा आमच्या भोजनालयाच्या भरवशावर बिनधास्त माहेरी जाणारा भगिनी वर्ग आहे हयाच समाधान वाटतं.
दिवाळी फराळ
फडकेंचा दिवाळी फराळ म्हणजे
पारंपारिक, चविष्ट पदार्थांची रेलचेल !
दरवर्षी दिवाळी आधी चार दिवस दिवाळी फराळाचे रुचकर पदार्थ आमच्या स्टॉलवर उपलब्ध असतात. उत्तम प्रतीचे,साजुक तुपातील लाडू, करंजी, अनारसे असे गोड पदार्थ व खुसखुशीत चिवडा, भाजणी च्या चकल्या असे तिखट पदार्थ असे अगदी घरगुती चवीचे सगळे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत आणि म्हणुनच दरवर्षी आमच्या आनंदी ग्राहकांची संख्या वाढत आहे.
सणांमधली मेजवानी
वाढविण्यासाठी गोडी सणांची
आम्ही देऊ साथ, चविष्ट पदार्थांची!
वर्षभरात येणाऱ्या सणांनिमित्त विविध रुचकर पदार्थांची मेजवानी फडके केटरर्स ग्राहकांसाठी घेऊन येतं. गणपती बाप्पासाठी उकडीच्या मोदका पासून ते होळी साठी पुरणपोळी पर्यन्त, सर्वच सणांमध्ये पारंपारिक नैवेद्याचे पदार्थ घेऊन सणांची गोडी वाढविण्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत.
आमच्या कामाची चित्रमय झलक
फडके केटरर्स चे खानपान म्हणजे कार्याची वाढते शान !
पत्ता
फडके भोजनालय, कैलास फोटो स्टुडिओ च्या मागे,
गंगाराम प्लॉट, भुसावळ.
वेळ
सकाळी 10:00 – रात्री 09.00
सोमवार – रविवार
पृष्ठ रचना व आलेखन : सौ.प्राची बर्वे. पुणे. || शब्दांकन : सौ.रेवती दाभोळकर. बडोदा.
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव आहेत © २०२१ फडके सर्व्हिसेस