उत्कृष्ठ व्यवस्था, स्वादिष्ट व्यंजन आणि विनम्र सेवा

ऑर्डर करा !

१९९३ च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर अगदी जुजबी भांडी विकत आणून ती भाड्याने देण्याचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला.कोणत्याही प्रकारची माहिती, अनुभव किंवा पाठबळ नसताना हिंमत करून पहिलं पाऊल उचललं होतं.त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.एकतर आमचं घर भुसावळ च्या मध्य वस्तीत आहे आणि त्यात घरा शेजारीच ब्राह्मण संघ हे अतिशय प्रसिद्ध,जुने मंगल कार्यालय असल्याने त्याचा तसा फायदा मिळाला.

स्वयंपाक करण्यासाठी लागणारी व्यवस्था,मुख्य आचारी किंवा महाराज,मदत करणारे लोक अशी माणूसबळ व्यवस्था, खानपान व्यवस्था सांभाळणे, असं हळूहळू, टप्प्याटप्प्याने शिकत सुरुवात झाली. कधी अंदाज चुकला,कधी ऐनवेळी काही प्रश्न निर्माण झाला…कधी व्यवहार फसला अशा सगळ्या अनुभवातून तयार होत होत १९९८ साली फडके केटरर्स ची सुरुवात केली. पुढे २००५ साली पहिल्यांदा अगदी मोजक्या प्रमाणात दिवाळीचे पारंपारिक पदार्थ बनवून दिवाळीच्या चार दिवस आधी लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल लावायला सुरुवात केली. उत्तम प्रतीचे,साजुक तुपातील लाडू, करंजी, अनारसे असे गोड पदार्थ व खुसखुशीत चिवडा, भाजणी च्या चकल्या असे तिखट पदार्थ असे अगदी घरगुती चवीचे सगळे पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले. याच धरतीवर इतर सण उत्सवानिमित विविध पारंपारिक पदार्थ ओर्डर प्रमाणे करून दिले जातात २००७ सालापासून घराजवळ भोजनालय सुरू केले आहे.सुग्रास, सात्विक,गरम जेवणाची सोय झाल्याने अनेक लोकांना त्याचा लाभ घेता येतो.
अनुभव नसतानाही शून्यातून सुरुवात केली होती पण तुमच्या सारख्या मायबाप ग्राहकांनी, हितचिंतकांनी, मित्रांनी आणि घरच्यांनी सतत पाठराखण केली. ती अशीच पुढेही कायम राहावी अशी नम्र विनंती. 

२०१६ मध्ये ‘आमोद फॅन्सी ड्रेसेस’ या नावाने ड्रेपरी हाऊस सुरू करून एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले. भुसावळ शहरात वाढणाऱ्या शाळांचे प्रमाण आणि उत्साही विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, गॅदरिंग, गणेशोत्सव यात विविध नाच,नाटक, एकांकिका यासाठी विविध पोशाख आपण उपलब्ध करून द्यावे असा विचार प्रत्यक्षात आणता आला. त्यामुळे मुलं आणि पालक यांना हवे ते ड्रेस अल्पशा भाड्याने वापरण्यास दिले जातात.

पत्ता

फडके भोजनालय, कैलास फोटो स्टुडिओ च्या मागे,
गंगाराम प्लॉट, भुसावळ.

वेळ

सकाळी 10 : 00 – रात्री 9 : 00
सोमवार – रविवार

शब्दांकन :  सौ.रेवती दाभोळकर. बडोदा.  || पृष्ठ रचना व आलेखन : सौ.प्राची बर्वे. पुणे.

सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव आहेत © २०२१  फडके सर्व्हिसेस

ऑर्डर करा !