लग्न असो वा मुंज, तुम्ही फक्त समारंभ ठरवा.. साजरा करण्याची व्यवस्था आम्ही करू!

आजवरचा प्रवास खरंच मोठा आहे .व्याप कधी वाढला हे लक्षात आले नाही. अनुभव नसतानाही शून्यातून सुरुवात केली होती पण तुमच्या सारख्या मायबाप ग्राहकांनी, हितचिंतकांनी, मित्रांनी आणि घरच्यांनी सतत पाठराखण केली. ती अशीच पुढेही कायम राहावी अशी नम्र विनंती.

१९९८ साली फडके केटरर्स ची सुरुवात केली.घरातल्यांना न विचारता हा उद्योग सुरू केला होता पण त्यांच्या पूर्ण मदतीची, पाठिंब्याची खात्री होती म्हणून ही मोठी उडी मारायची हिंमत करू शकलो.
पदार्थांची उत्तम चव, काटेकोर स्वच्छता आणि प्रामाणिक व्यवहार कायम राखल्यामुळे व्यवसायात यश दिसू लागले. लोकांनी दाखवलेला विश्वास आणि घरच्यांची साथ हे फडके केटरर्स च्या यशाचे मुख्य स्तंभ आहेत.

त्याच बळावर जवळपास १५०० पेक्षा जास्त लग्न व मुंज व स्वागत समारंभाचे केटरिंग केले आहे.याशिवाय एकुण १४०० पेक्षा जास्त वाढदिवस, साखरपुडा, डोहाळजेवण, रिटायरमेंट ईत्यादि च्या निमित्ताने होणारे समारंभ, पार्टी चे यशस्वी नियोजन व व्यवस्थापन केले आहे.आमचे संतुष्ट ग्राहक आनंदाने आम्हाला पुन्हा पुन्हा सेवेची संधी देतात हे आमच्या कामाचं प्रमाणपत्र आहे.

ऑर्डर करा !
फडके केटरर्स
फडके केटरर्स चे खानपान म्हणजे कार्याची वाढते शान...

शुभविवाह, साखरपुडा, स्वागत समारंभ, वाढदिवस, शुभारंभ सोहळा, वास्तूपूजन...

कार्यक्रम कुठलाही असो उत्कृष्ठ व्यवस्था, स्वादिष्ट व्यंजन आणि विनम्र सेवा यासोबत सोहळ्याचाआनंद द्विगुणीत करण्यासाठी आम्ही कायम सज्ज आहोत!

आमची खासियत शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट व्यंजने 

लग्नसमारंभा साठी संपूर्ण पॅकेज उपलब्ध -

मंडप, डेकोरेशन, अक्षदा, घोडा, मंगल वाद्य, विहिणी ची पंगत, रांगोळी, ओटी, फ़ुलहार गुच्छ, लाडू चिवडा पॅकेट, मातृभोजन ,चौल ,बग्गी , पगडी इत्यादी.

जसे महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, चाट, अशा सर्वच डिशेष आपल्या समारंभाची गोडी नक्कीच वाढवतील.

पत्ता

फडके भोजनालय, कैलास फोटो स्टुडिओ च्या मागे,
गंगाराम प्लॉट, भुसावळ.

वेळ

सकाळी 10 : 00 – रात्री 9 : 00
सोमवार – रविवार

पृष्ठ रचना व आलेखन : सौ.प्राची बर्वे. पुणे. || शब्दांकन :  सौ.रेवती दाभोळकर. बडोदा. 

सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव आहेत © २०२१  फडके सर्व्हिसेस

ऑर्डर करा !