भोजनालय
२००७ सालापासून फडके भोजनालय सुग्रास, सात्विक,गरम जेवणाचा आनंद येथे येणाऱ्या खवय्यांना देत आहे.
घरच्यांच्या जेवणाची काळजी उरली नाही आता….!
असं सांगणारा आमच्या भोजनालयाच्या भरवशावर बिनधास्त माहेरी जाणारा भगिनी वर्ग आहे हयाच समाधान वाटतं.
बाहेरगावी फॅमिली पण नोकरी भुसावळला असलेल्या नोकरदार लोकांना प्रथमच वेळेवर व्यवस्थित जेवण मिळू लागल्याने किती तरी लोक महिन्याच्या हिशोबाने नियमितपणे जेवणारे बांधील ग्राहक आहेत.
भुसावळ हे रेल्वे चे अतिशय मोठे जंक्शन आहे.दिवसाला शेकडो गाड्या भुसावळ स्टेशन वरून जा ये करत असतात.लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्टेशन वर जेवणाचे डबे देण्यास आम्ही २०१२ दरम्यान सुरुवात केली.
तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी व्हाया भुसावळ प्रवास करत असाल तर आमच्या सेवेचा जरूर लाभ घ्या. माहितीसाठी संपर्क क्रमांक शेवटी देत आहे
फडके भोजनालय
गरम चविष्ट नाश्ता दिवसाची आरोग्यदाई सुरवात
उपमा, पोहे, इडली चटणी, साबुदाणा खिचडी, रवा शिरा, मसाला खिचडी, पेशंट खिचडी, दलिया.
इथे येऊन पार्सल नेऊ शकता व ज्यांना इथे येणे शक्य नाही असे जेष्ठ नागरिक, बँक कर्मचारी अशांसाठी घरपोच सेवा उपलब्ध आहे !
खाद्यपदार्थांची चविष्ट सफर..!
रोजच्या रुचकर आणि परिपूर्ण जेवणासाठी थाळी आणि अस्सल खान्देशी पदार्थ जसे शेव भाजी, पिठलं भाकरी, तसेच सर्वांच्या आवडत्या पंजाबी भाज्या आणि बिर्याणी असे सर्वच पदार्थ ताजे जिन्नस व स्वच्छता पाळून तयार केले जातात.
रुचकर जेवणाची पंगत
पत्ता
फडके भोजनालय, कैलास फोटो स्टुडिओ च्या मागे,
गंगाराम प्लॉट, भुसावळ.
वेळ
सकाळी 10 : 00 – रात्री 9 : 00
सोमवार – रविवार
पृष्ठ रचना व आलेखन : सौ.प्राची बर्वे. पुणे. || शब्दांकन : सौ.रेवती दाभोळकर. बडोदा.
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव आहेत © २०२१ फडके सर्व्हिसेस